अकोला (MLA Tukaram Bidkar) : शिवणी विमानतळावरून महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची भेट घेऊन परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर (MLA Tukaram Bidkar) व त्यांचे मित्र राजदत्त मानकर यांच्या दुचाकीला समोरून जनावरे घेऊन येणार्या अॅपेने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात राजदत्त मानकर यांचा जागीच मृत्यू झाला तर माजी आ. तुकाराम बिडकर (MLA Tukaram Bidkar) यांचा रूग्णालयात मृत्यू झाला. सदर घटना गुरूवार, १३ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शिवर येथील अवधूत पेट्रोल पंपानजिक घडली.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर (MLA Tukaram Bidkar) आणि त्यांचे मित्र व गणेश कला महाविद्यालयाचे लिपिक राजदत्त मानकर हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शिवणी विमानतळावर भेट घेऊन एमएच ३० बीआर ९११० क्रमांकाच्या दुचाकीने परत येत होते. यावेळी शिवर येथील अवधूत पेट्रोलपंपासमोर बोरगाव मंजूकडून जनावरे घेऊन येणार्या अॅपेने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
सदर धडक एवढी भीषण होती की यात राजदत्त मानकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर माजी आ. तुकाराम बिडकर (MLA Tukaram Bidkar) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने अकोला येथील खासगी रूग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच माजी आ. तुकाराम बिडकर (MLA Tukaram Bidkar) यांचा अकोल्यात अपघात झाला होता. त्यांच्यावर मुंबई येथे उपाचार झाले होते. या अपघातातून ते सहिसलामत वाचले होते. परंतु गुरूवारी मात्र नियतीने आपला डाव साधला असल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.