लातूर (MNS Andolan) : सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव द्यावा आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामाच्या फेऱ्यातून अडकवता तात्काळ हेक्टरी 50 हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी मनुष्याच्या वतीने मंगळवारी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन (MNS Andolan) करण्यात आले.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकवता तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत विनाअट देण्यात यावी. सोयाबिनला 8000 रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा. (MNS Andolan) शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जिल्हा परिषद लातूरच्या आवारातील पूर्णाकर्ती पुतळ्याचे तात्काळ अनावरण करण्यात यावे. पानगाव ते खरोळा फाटा रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. लातूर-मुरुड-बार्शी-कुर्डूवाडी-टेंभूर्णी या लातूर जिल्ह्याचे रक्तवाहिनी असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरण तात्काळ करण्यात यावे. गतवर्षी लातूर जिल्ह्यातील खरीप व रब्बीच्या हंगामात पिकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा.
पीकविमा कंपनीचे जिल्ह्याचे व तालुक्याचे कार्यालय बंद आहेत, त्यामुळे ऑफलाईन तक्रार दाखल करता येत नाही त्यासाठी विमा कंपनीचे सर्व कार्यालय सुरू ठेवावीत. पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करावी जेणेकरून अनुदान,नुकसान भरपाई, पिकविमा शेतकऱ्यांना मिळेल. शासनाने फक्त 13 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी न करता महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांचे सर्वच सोयाबीन 8000 रू.प्रमाणे खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा, आदी मागण्यांसाठी हे (MNS Andolan) आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात (MNS Andolan) मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, भागवत शिंदे, सचिन सिरसाट, वाहिद शेख, अजय कलशेट्टी, रणवीर उमाटे, अंकुश शिंदे, मनोज अभंगे, सचिन बिराजदार, अतिष सूर्यवंशी, सतीश जंगाले, महेश बनसोडे, बाळासाहेब मुंडे, सुरेश शेवाळे, महेश देशमुख, श्रीनिवास शिंदे, महेश माने, विशाल कातळे, देवा पवार, भागवत कांदे, बालाजी भरभडे, लालासाहेब मोहिते, जहांगीर शेख, नाना धुमाळ, बळीराम सुडे, बजरंग ठाकूर, विश्वास शिंदे, ऋषीकेश सूर्यवंशी, प्रदीप घोरपडे, बालाजी धोत्रे, सोमनाथ ढोले, श्रीपाल बस्तापुरे, सचिन इगे, वंदनाताई केंद्रे, प्रदीप माने, ज्ञानेश्र्वर जगदाळे, सुरेश गालफाडे,चेतन चौहान, दौलत मुंडे, शुभम डोंगरे, गणेश अबरबंडे, राम नागरगोजे,नाना जाधव, हमीद शेख, शिवराज सिरसाट, भरत होळंबे, सुनील लटपटे, महादेव होळंबे, चंदू केंद्रे, नरसिंग बिडवे, प्रमोद कांदे, सचिन रोंगे, संदीप भुजबळ, विनोद एरंडे, व्यंकटेश ढोणे, राम शिंदे, ऋत्विक राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते.