हिंगोली(Hingoli) :- विधानसभा निवडणूक (Assembly Elections) निमित्ताने उमेदवारांच्या चाचपणी करता मनसे प्रमुख (MNS chief) राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे गुरुवारी हिंगोलीत मोठ्या जल्लोषात मनसे सैनिकांनी स्वागत केले पदाधिकारी व कार्यकर्त्यात मोठा उत्साह दिसून आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे 8 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात स्वागत
हिंगोलीत बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे 8 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणूक निमित्ताने संभाव्य उमेदवाराची चाचपणी करण्याकरता आगमन झाले आहे. त्यांच्या आगमन दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला हिंगोलीत जेसीबी द्वारे फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ८ व ९ ऑगस्ट या दोन दिवशी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती व पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यानिमित्त मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्यासह मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू उर्फ प्रमोद कुटे, जिल्हा सचिव दिपकराव वडकुते , महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे आधी पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्याचे योग्य नियोजन केले आहे. या दौरा निमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.