देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (MNS Ganesh Barbade) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून चिखली विधानसभेसाठी गणेश बरबडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. (MNS Ganesh Barbade) गणेश बरबडे हे मनसे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आहे.
शिवसेनेपासून राजकीय ल सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेले गणेश बरबडे (MNS Ganesh Barbade) हे चिखली शहरातील संभाजीनगर मधील शाखाप्रमुख पदापासून त्यांनी पक्ष संघटने सुरुवात केली. राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर पुन्हा त्यांनी चिखली शहरातील संभाजीनगर भागातून संघटनेची सुरुवात करून आज मनसे जिल्हाप्रमुख पदापर्यंत (MNS Ganesh Barbade) त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे आणि त्याचेच फलित म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चिखली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमकपणा हा त्यांचा स्वभाव आणि युवकांची संघटन ही त्यांची ओळख आहे.