नांदेड (MNS Raj Thackeray) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) हे आज नांदेड दौऱ्यावर आले आहेत. ते नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी थांबले आहेत. उद्या गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी आणि पक्ष निरीक्षकांची बैठक घेऊन जिल्ह्यातील नऊ (Assembly Constituency) विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेतील. यावेळी इतर पक्षांतील काही नाराज मंडळींचा पक्षप्रवेश होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा (Assembly Constituency) विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी (MNS Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते उद्या नांदेडमधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या बैठक घेवून नांदेडच्या 9 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. ते सध्या नांदेड शहरात मुक्कामी आहेत.