चारही विधानसभा मतदार संघांचा घेणार आढावा
परभणी (MNS Raj Thackeray) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विधानसभा निवडणूकीच्या (Assembly constituency) अनुषंगाने महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. शनिवार १० ऑगस्ट रोजी ठाकरे हे परभणी जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा (Assembly constituency) आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, शेख राज यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे शनिवार १० ऑगस्ट रोजी चारही मतदार संघातील पदाधिकारी यांच्या सोबत सावली विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत. शिवाय परभणी, जिंतूर -सेलू, गंगाखेड, पाथरी या चारही विधानसभा मतदार संघाचा आढावा राज ठाकरे हे घेणार आहेत. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख रुपेश देशमुख, शेख राज, गणेश सुरवसे, जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, लक्ष्मणराव रेंगे, यादव महात्मे, अनिल बुचाले, राहुल डोंगरे, गोविंद ठाकर, आकाश जामगे, अंकुश शेटे, श्रीकांत पाटील, पवन बोबडे, राहुल चव्हाण, सूर्यकांत मोगल, प्रतीक जैस्वाल, अजय फुलमाळी, प्रशांत टाक आदींनी केले आहे.