शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची मागणी
अहमदपूर (MNS Rasta-Roko) : कुठलेही पंचनामे व ई-पीक पाहणीची अट न घालता अहमदपूर चाकूर मतदारसंघातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या व जिल्हा परिषदेतील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे तात्काळ अनावरण करा; अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांंच्या नेतृत्त्वाखाली चापोली येथील (MNS Rasta-Roko) राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि.१३) रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले.
गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळा अनावरणाची मागणी
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनला 8000 रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, गतवर्षी लातूर जिल्ह्यातील खरीप व रबीच्या हंगामात पीकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा, पीकविमा कंपनीचे जिल्ह्याचे व तालुक्याचे कार्यालये बंद असल्यामुळे ऑफलाईन तक्रार दाखल करता येत नाही, त्यासाठी विमा कंपनीचे सर्व कार्यालये सुरू ठेवा आदी मागण्या तहसीलदार जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात (MNS Rasta-Roko) मनसे तालुकाध्यक्ष सूर्यकांत शेवाळे, शिंदे, संतोष गडदे आदींनी मनोगते व्यक्त केले. आंदोलनात नरसिंग शेवाळे, शिवाजी कदम, रमाकांत संमादे, चंद्रकांत मलिशे ,संतोष गडदे, महालिंग होनराव, राजू गुडपल्ले, नवनाथ गोरगळे, विजयकुमार शंकरे, गुंडप्पा शंकरे, भागवत चाटे, जगन्नाथ भालेराव ,भगवान कांबळे, गणेश तेलंगे, किशोर स्वामी सोमनाथ कडबळे, माधव कडबळे, शिवार कोडवडे, मधुकर जगदाळे, बाळू जगदाळे, सुधाकर शंकरे ,विलास शेवाळे, मालू कोरे ,बिरु शेवाळे, दगडू शेवाळे, दादा आलमले, पिंटू बालवाड, शिवा जगदाळे ,बालाजी कोरे, पिंटू माने ,जगन्नाथ बेल्लाळे, हरीश कांबळे आदींसह अनेक मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डाॕ. भिकाणे यांचा सरकारला इशारा
मनसेने (MNS Rasta-Roko) केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करा; अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची जिम्मेदारी सरकारची असेल, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी यावेळी बोलताना शासनाला दिला.