पुसद (Mobile addiction) : अडचणींच्या वेळी मोबाईल फोनद्वारे मदत व अनेक कामे सोपी होण्यासाठी (Mobile addiction) मोबाईलचा वापर व्हावा, अशी अपेक्षा असताना लहान मुले, युवक मात्र मोबाईलच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. शालेय वयात मैदानावर जाऊन खेळणे, हुंदडणे यासह खेळाडू वृत्तीत वाढ होण्याच्या वयात सध्याची पिढी मात्र मोबाईल हातात घेऊन त्यावर गेम्स खेळण्याच्या खेळात अडकलआहे. त्यामुळे मोबाईल फोन (Mobile phone) हातात नसल्यास किंवा पालकांनी हातातून मोबाईल घेतल्यास मुलांची चिडचिड वाढत आहे. त्यांना राग येत आहे. त्यामुळे त्याच्या वागण्यात, वर्तनात विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहे.
एकलकोंडेपणा वाढण्याचा धोका
हातात मोबाईल असताना व्हिडीओ गेम खेळणे, गाणे ऐकणे, मित्र मैत्रिणींबरोबर चॅट करणे आदी कारणांमुळे स्क्रिन टाईम वाढत जात आहे. परिणामी (Mobile addiction) मोबाईलवर विसंबता वाढत जाऊन नैसर्गिक स्मृतीवर परिणाम होताना आढळत आहे. दैनंदिन कामे करतांना विसरणे, अभ्यासात लक्ष न लागणे, मन न लागणे, अस्वस्थ वाटणे, मोबाईल दुर झाल्यास चिडचिडपणा वाढणे आदी प्रकरणात वाढ होत आहे. त्यामुळे लहान मुलांचे व विद्यार्थ्यांचे बालपण हिरावले जाते की काय ? असे वाटू लागले आहे.
मुले मैदानी खेळापासुन होताहेत दुर
युवकांमध्ये देखील मोबाईलचा वापर प्रमाणापेक्ष वाढला आहे. नव-नवीन (Mobile games) मोबाईल गेम्स खेळतांना, त्यावर तासंतास् वेळ देतांना, काम करत असतांन मोबाईलचा वापर, प्रवासात वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे युवकांचे भविष्ट मोबाईलच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. यामुळे (mental health) मानसिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होताना दिसून येत आहे. पालकांनी या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून लहान मुलांचे तरुणांचे मानसिक स्वास्थ खराब होणार नाही. व मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होणार नाही. याची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.