परभणी(Parbhani) :- जिंतूर रोडवरील रायगड कॉर्नर येथे उतरल्यानंतर डि.एड. महाविद्यालयाच्या मैदानावरुन इनायत नगरकडे जात असलेल्या एका पत्रकाराला(Journalist) थांबवून मोबाईल आणि पैशांची मागणी करत थापडबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना १सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची(Crime) नोंद करण्यात आली आहे.
डि.एड. महाविद्यालयाच्या मैदानावरील घटना
सोमनाथ स्वामी यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे इनायत नगरकडे जात असताना डि.एड. महाविद्यालयाच्या मैदानावर काही अनोळखींनी त्यांना थांबविले. मोबाईल, पैशांची मागणी करत मारहाण केली. यावेळी त्यांच्या ओळखीतील दोघेजण जात होते. त्यांनी भांडण सोडविले. सदर प्रकरणी अनोळखींवर कोतवाली पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.