युवकांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली
कळमनुरी (Mobile Shop fire) : कळमनुरी शहरात दि. २० जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जुना बस स्टँड परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीला अचानक आग लागल्याने या आगीमध्ये लाखो रुपयाचे (Mobile Shop fire) मोबाईल व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जुना बस स्टँड परिसरात मुंडळ रोडवर असलेले शिंदे (Mobile Shop fire) मोबाईल शॉपीचे मालक दुकानाचे शटर अर्धे लावून आपल्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले असता याच वेळी दुकानातून अचानक धूर निघत असल्याचे या परिसरातील नागरिकांना लक्षात आले काहींनी अग्निशामक दलाशी मोबाईलवर संपर्क साधून अग्निशामक दलास तात्काळ घटनास्थळी बोलविले यानंतर अग्निशामक दलाचे त्र्यंबक जाधव, गजानन इंगळे हे घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी घेऊन दाखल होत आग विजविण्या साठी प्रयत्न करीत होते.
विशेष म्हणजे काही लोकांनी आपला जीव धोक्यात घालून (Mobile Shop fire) मोबाईल शॉपी चे शटर उघडले असता शटरच्या आत मोठ्या प्रमाणात आगीचे डोंब सुरू होते परंतु शिवसेनेचे कार्यकर्ता फारुख पठाण,पत्रकार गोविंद बेद्रे, उमर फारुख शेख,गजानन पाध्ये, जय जाधव,सोहेल पठाण,सलमान शेख, दत्ता गोरे, पांडू सातव,अखिल सिद्धीकी,शेख नदीम यांच्यासह युवकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घेतले यामुळे आजूबाजूचे दुकान वाचले. परंतु या घटनेत (Mobile Shop fire) मोबाईल शॉपी मधील लाखो रुपयांचे मोबाईल व इतर साहित्य जळून खाक झाले असुन ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.




