नवी दिल्ली (One Nation One Election) : ‘वन नेशन-वन इलेक्शन’च्या प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाने (Modi Cabinet) मंजुरी दिली आहे. सुमारे वर्षभर विचारमंथन केल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मंजुरी दिली आहे. देशातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावर या प्रस्तावाचा भर आहे. संसाधने वाचवणे, विकासाला गती देणे आणि लोकशाही मजबूत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने (One Nation One Election) वन नेशन वन इलेक्शनच्या शक्यतांबाबत आपला अहवाल सादर केल्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी
- या प्रस्तावावर काम करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती.
- या समितीने मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये काही महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या होत्या.
- लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (जसे नगरपालिका आणि पंचायती) 100 दिवसांच्या आत घ्याव्यात.
- या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी एक ‘अंमलबजावणी गट’ स्थापन करण्यात यावा.
- एक समान मतदार यादी आणि (One Nation One Election) एकच मतदार ओळखपत्र अशी व्यवस्था असावी, जी निवडणूक आयोग (ECI) आणि राज्य निवडणूक प्राधिकरणांशी सल्लामसलत करून तयार केली जावी.
वन नेशन-वन इलेक्शनचा काय फायदा होणार?
- संसाधनांची बचत होईल.
- विकास आणि सामाजिक सौहार्दाला चालना मिळेल.
- लोकशाहीचा पाया मजबूत होईल.
- त्यामुळे देशाच्या आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.
घटनादुरुस्ती आणि प्रक्रिया
ही योजना लागू करण्यासाठी समितीने 18 घटनादुरुस्तीची शिफारस केली आहे. यापैकी बहुतेक सुधारणांना राज्य विधानमंडळांच्या संमतीची आवश्यकता नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये घटना दुरुस्ती विधेयके संसदेद्वारे मंजूर करावी लागतील. तसेच, काही बदलांना निम्म्या राज्यांनी मान्यता द्यावी लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) दीर्घकाळापासून या योजनेचे समर्थक आहेत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे (One Nation One Election) केवळ निवडणूक प्रक्रिया सुलभ होणार नाही, तर देशात राजकीय स्थैर्य आणि विकासाला चालना मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.