भरधाव टिप्परने दुचाकीस्वार तरूणास चिरडले
सातोना-बीड रस्त्यावरील दुर्दैवी घटना
मोहाडी/भंडारा (Mohadi Accident) : तालुक्यातील वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील सातोना-बीड रस्त्यावर दि.६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान भीषण अपघात घडला. एका भरधाव टिप्परने दुचाकीस चिरडले. त्यात दुचाकीस्वार तरूणाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. करण रणवीर बांते (१८) रा. बीड असे मृतकाचे नाव आहे. बहिणीला शाळेत सोडून गावाकडे परत जाणार्या भावाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड येथील करण बांते हा (Mohadi Accident) घटनेच्या दिवशी सकाळी त्याची मो’ी बहीण सेजल बांते हिला भंडारा येथे जाण्यासाठी मोटारसायकल क्र.एम.एच.३६/सी.१०४५ या गाडीने सातोना बसस्थानकावर सोडले. बहिणीला सोडून गावाकडे परत जात असताना सातोना-बीड रस्त्यावर स्मशानभूमीजवळ विरूध्द दिशेने येणारा ट्रेलर क्र.एम.एच.४०/ए.के.६६५७ चा चालक पवन पटेल (२३) रा. देवरा (म.प्र.) याने ट्रेलर निष्काळजीपणे चालवून मोटारसायकलला धडक दिली. यात दुचाकीस्वार ट्रेलरच्या समोरील चाकामध्ये मोटारसायकलसह येऊन जवळपास १० फूट फरफटत गेला व त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती गावात व परिसरात होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही तास घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. ट्रेलरचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी काही काळ घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
बीड येथील मृतक करण बांते हा सातोना येथे मॉडर्न हायस्कूल येथील बाराव्या वर्गात शिकत असल्याचे सांगितले जाते. (Mohadi Accident) अपघाताची माहिती वर’ी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. त्याचे मृत्यूपश्चात आई-वडील, दोन बहीण असा परिवार आहे. करण हा आई-वडिलांना एकुलता एक होता. त्याच्या अपघाती मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची नोंद वर’ी पोलिसात केली आहे.