डोंगरगाव शेतशिवारात येथील घटना
आंधळगाव (Mohadi Heavy Rain) : मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव शेत शिवारात धान रोवणीच्या कामासाठी गेलेल्या महिलांवर (Heavy Rain lightning) वीज पडल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना काल दुपारी साधारणत: तीन वाजता घडली. आंधळगाव येथील आशा सुरेश सोनकुसरे (५४) आणि कमला सुखा गोखले (६४), या दोन महिलांचा वीज पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी शेतात काम करत असलेल्या अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये आंधळगाव येथील रुखमा बंडू निमजे, मैना पतिराम सोनकुसरे तर डोंगरगाव येथील वंदना मधुकर जीभकाटे, निशा जीभकाटे यांचा समावेश आहे.
जखमींना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाडी रुग्णालयात (Mohadi Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक (Mohadi Police) घटनास्थळी दाखल झाले. या (Heavy Rain lightning) घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, मृत महिलांच्या कुटूंबियांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आंधळगाव ग्रामवासी यांनी केली आहे.




