परभणी (Parbhani):- माझ्या सोबत लग्न कर, असे म्हणत चुलत मामाच्या मुलाने २९ वर्षीय महिलेचा विनयभंग (molestation)केला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझ्या सोबत लग्न कर, असे म्हणत मागील सहा महिन्यापासून त्रास देण्यास सुरुवात
पिडितेच्या पतीचे दिड वर्षापूर्वी निधन (passed away) झाले आहे. तेंव्हा पासून पिडिता आईकडे राहते. याच गल्लीत चुलत मामाचा मुलगा सुमित हा देखील राहतो. त्याने पिडितेला माझ्या सोबत लग्न कर, असे म्हणत मागील सहा महिन्यापासून त्रास देण्यास सुरुवात केली. या बाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र आरोपीच्या वागण्यात सुधारणा झाली नाही. २५ मे रोजी रात्री आठ वाजता पिडिता ही रुग्णालयात (hospital) काम करुन बाहेर आली असता आरोपीने तिला मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे, असे म्हणत आत्महत्या (Suicide) करण्याची धमकी(threat) दिली. घडला प्रकार पिडितेने आईला सांगितला. त्यानंतर नानलपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार देण्यात आली आहे.
कटरने मारुन विवाहितेला केले जखमी
घरगुती वादात कटरने मारुन विवाहितेला जखमी (wounded) करण्यात आल्याची घटना २६ मे रोजी दुपारी दोन ते अडिच वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर नगर साखला प्लॉट येथे घडली. ज्योती खापरे या विवाहितेने तक्रार दिली आहे. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात पतीने कटरने मारुन विवाहितेला जखमी केले. तसेच सासरच्या मंडळींनी या ना त्या कारणाने विवाहितेचा छळ (Harassment of the married) करुन तिला मानसिक, शारीरिक त्रास(physical distress) दिला. तु जर पोलीस स्टेशनला गेली तर जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी विशाल खापरे, छाया खापरे, जगन्नाथ खापरे, वर्षा हेरे, संदीप हेरे यांच्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.