जवळीक साधुन ‘तीचा’ विनयभंग
हिंगोली(Hingoli) :- हट्टा पोलिस ठाणे हद्दीतील एका ३९ वर्षीय महिलेस घर बांधकामासाठी लागणारी वाळु पुरविण्याच्या कारणावरून तीच्याशी वारंवार जवळीक साधुन तीचा विनयभंग (molestation) केल्याने हट्टा पोलिसात एकावर गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला.
कंटाळलेल्या महिलेने त्याचा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला
औंढा नागनाथ तालुक्यातील एका गावामधील अंगणवाडी सेविका(Anganwadi worker) असलेल्या महिलेस घर बांधकामासााठी लागणारी वाळु तुम्हाला पुरवितो या कारणावरून हनुमान बापुराव सावंत रा. बोरी सावंत या आरोपीने तीला वारंवार फोन करून तीच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच वारंवार फोन करीत असताना भलतीच मागणी करीत असल्याने या प्रकाराला कंटाळलेल्या महिलेने त्याचा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकुन दिला.
आरोपीविरूद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल
३० एप्रिल रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील एका दुकानात सदर महिला गेली असता माझा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये (Black list) का टाकला अशी विचारणा हनुमान सावंत याने करून महिलेचा विनयभंग केला. या घडलेल्या प्रकारामुळे महिलेने थेट २ मे रोजी हट्टा पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून हनुमान बापुराव सावंत याच्या विरूद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोविंद जाधव हे करीत आहेत.