Monsoon update:- मान्सून 2024 अंदमान मध्ये वेळेत आला. केरळ (Kerala)मध्ये पण लवकर आला. महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये पण मान्सून वेळेत आला. परंतु मान्सून वेळेवर सक्रीय झाला नाही. कारण जेव्हा मान्सून दाखल होतो. तेव्हा तो सक्रीय होण्यास अरबी समुद्र (arabian sea) किंवा बंगालच्या उपसागरात ताकतवान कमी दाब किंवा वादळी सिस्टीम तयार होणे गरजेचे असते. तेव्हा मान्सूनला गती मिळते.
विरळ स्वरूपात भाग बदलत पाऊस महाराष्ट्र मध्ये पडत राहील
सध्या दोन्ही समुद्र मध्ये बाष्प कमी आहे. म्हणून मान्सूनची प्रगती होत नाही. सध्या विरळ स्वरूपात भाग बदलत पाऊस महाराष्ट्र मध्ये पडत राहील. परंतु दिनांक 23 जून पासून मात्र मान्सून सक्रीय होऊन दोन्ही समुद्र मध्ये मोठे कमी दाब होतील. व पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्यता आहे. दिनांक 25 जून पासून संपूर्ण भारतात मोठे पावसाळी वातावरण असेल. म्हणून फार चिंता करू नये. अती जोरदार पाऊस महाराष्ट्र मध्ये होण्याचा अंदाज दिनांक 23 जून नंतर आहे. सध्या मात्र मान्सून सरी काही भागात होतील. वातावरणात बदल झाला तर तसा संदेश दिला जाईल. असा अंदाज हवामान तंज्ञ गणेश शेळके यांनी दिली आहे.