मुंबई (Devendra Fadnavis) : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon session) आज पेपरफुटीवर जोरदार चर्चा झाली. राज्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेत घोटाळा होत असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पेपेरफुटी प्रकरणांत (Paper shredding cases) कोट्यवधींचा घोटाळा होत असल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. पेपरफुटीचा प्रश्न गंभीर आहे. टीसीएस स्वत:च्या केंद्रावरच परीक्षा घेते, पण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने बाहेरील केंद्रावर परीक्षा घेतली होती. यापुढच्या परीक्षा मात्र टीसीएसकडून आपल्या केंद्रांवरच घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तलाठी भरतीमध्ये (Talathi Bharti) पेपर फुटला नाही, तर पेपरच उत्तर चुकले. जी उत्तराची पद्धत असते त्यामध्ये चूक झाली. जर उत्तर चुकलं असेल तर नियमानुसार सगळ्यांना समान गुण दिले जातात. पण नंतर तो पेपर रद्द केला, असे फडणवीस यांनी सांगितले. पेपरफुटीतील आरोपींना १० वर्षांची शिक्षा करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. पेपरफुटीच्या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचे मान्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापुढे पेपरफुटीसारखी प्रकरणे रोखण्यासाठी परीक्षा पद्धतीतील बदल सभागृहात सांगितले. तसेच (Paper shredding cases) पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्राने कायदा केला आहे. त्या नुसार राज्यसरकार देखील कायदा करणार असून. (Monsoon session) पावसाळी अधिवेशनातच हा कायदा सभागृहात मांडला जाणार असल्याचे, फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात सांगितले .