अकोला (Akola) :- सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या शोषितांच्या व्यथा देशाच्याच नव्हे तर विदेशाच्या वेशीवर मांडून त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० मध्ये सुरू केलेल्या पहिल्या वर्तमानपत्र (newspaper) ‘मूकनायक’ पाक्षिकाचे पहिले संपादक म्हणून केळीवेळी येथील समाजसुधारक पांडुरंग नंदरामजी भटकर यांची नियुक्ती केली होती. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला समर्पित असलेला सन्मानाचा मूकनायक महोत्सव व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा (Journalist Award Ceremony) केळीवेळी येथे १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वा. आयोजित केला आहे, अशी माहिती मूकनायक महोत्सवाचे अध्यक्ष माजी आमदार हरिदास भदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी मुख्य संयोजक मधुसूदन भटकर, सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले, मूकनायक महोत्सव समिती अध्यक्ष अनिल तायडे, पद्माकर वासनिक आदींची उपस्थिती होती. राज्यसभा खासदार तथा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक चंद्रकांत हंडोरे मूकनायक महोत्सवाचे उद्घाटक असून, मुख्य अतिथी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे, लोकनायक, शेतकरी नेते दै. देशोन्नतीचे (Deshonnati) मुख्य संपादक प्रकाश पोहरे (Editor Prakash Pohre) राहणार आहेत. तसेच आमदार नितीन देशमुख, आमदार साजिदखान पठाण, दर्यापूरचे आमदार गजानन लवटे, नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, माजी आमदार हरिदास भदे, गजाननराव दाळू गुरूजी, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, काँग्रेस नेते प्रकाश तायडे, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत पाचडे, संजय बोडखे, केळीवेळी ग्राममंडळ अध्यक्ष किशोर बुले, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू डॉ. राजकुमार बुले, तपस्सू मानकीकर आदींसह भीमशक्ती व सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. संपूर्ण अकोला जिल्ह्यासाठी भूषणावह असलेल्या या कार्यक्रमासाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हरिदास भदे यांनी यावेळी केले.
समाज प्रबोधनाचा कार्यक्रम
नागपूर येथील भीमदास नाईक आणि संच यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार असून, कार्यक्रम यशस्वीतेकरिता विविध महिला संघ, क्रीडा मंडळे, सामाजिक संस्था आदी परिश्रम घेत आहेत.
प्रकाश पोहरे यांचा ‘मूकनायक’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मान्यवरांच्या मनोगतातून समाजातील ज्वलंत प्रश्नावर वैचारिक मंथन होणार आहे. दुसऱ्या सत्रात सरकाराच्या धोरणाविरोधात निर्भीडपणे भिडणारे, भूमिपुत्रांसाठी आयुष्य वेचत असलेले दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना मूकनायक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. तर जिल्हा मूकनायक पुरस्काराने शौकत अली मिरसाहेब या ‘चा गौरव करण्यात येणार आहे.
