अकोला (Mooknayak Prakash Pohare): सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या शोषितांच्या व्यथा देशाच्याच नव्हे तर विदेशाच्या वेशीवर मांडून त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 मध्ये सुरू केलेल्या पहिल्या वर्तमानपत्र (newspaper) ‘मूकनायक’ पाक्षिकाचे पहिले संपादक म्हणून केळीवेळी येथील समाजसुधारक पांडुरंग नंदरामजी भटकर यांची नियुक्ती केली. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला समर्पित असलेला सन्मानाचा मूकनायक महोत्सव व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा (Journalist Award Ceremony) केळीवेळी येथे आज आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मान्यवरांच्या मनोगतातून समाजातील ज्वलंत प्रश्नावर वैचारिक मंथन झाले. दुसऱ्या सत्रात सरकाराच्या धोरणाविरोधात निर्भीडपणे भिडणारे, भूमिपुत्रांसाठी आयुष्य वेचत असलेले दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे (Mooknayak Prakash Pohare) यांना मूकनायक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर जिल्हा मूकनायक पुरस्काराने शौकत अली मिरसाहेब यांचा गौरव करण्यात आला.