देशोन्नती वृत्तसंकलन
मूल (Mool Murder Case) : येथील वर्दळीचे ठिकाण असलेल्या तहसिल कार्यालयासमोर पंचायत समितीलगत असलेल्या प्रवाशी निवाऱ्यात बसून असलेल्या एका ३० वर्षीय युवकाची अज्ञात युवकांच्या टोळीने धारदार शस्त्रांनी वार करून (Mool Murder Case) हत्या केल्याची खळबळजनक घटना काल शुक्रवार दि. २७ डीसेंबरला रात्री १०. १५ वाजताच्या दरम्यान घडली. ऋतीक अनिल शेंडे (३०) रा. विहीरगाव मूल असे मृतक तरूणाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपीना चंद्रपुरातून अटक करण्यात आली असून त्यांना मूल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल येथील विहीरगांव परिसरातील वार्ड नं. १६ येथील रहीवाशी असलेला ऋतीक अनिल शेंडे (३०) हा तरूण काल रात्री घरून जेवन आटोपून १०.१५ वाजताचे सुमारास मूल – चंद्रपूर मुख्य मार्गावरील पंचायत समिती समोरील न.प. प्रवासी निवाऱ्यात एकटा बसून होता. दरम्यान दुचाकीवर आलेल्या अज्ञात युवकांनी ऋतीक शेडेवर हल्ला केला व (Mool Murder Case) छाती आणि पोटावर चाकुने तब्बल २४ वार केले. यात ऋतीकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मारेकऱ्यांमध्ये व मृतकात झटापट सुरू असतांना रस्त्यावरून फिरणाऱ्यांनी मृतक ऋतीकला त्या युवकांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र मारेकऱ्यांनी त्यांनाही चाकुचा धाक दाखवुन आपले काम फत्ते केले व घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान युवकाच्या हत्येची (Mool Murder Case) माहिती मूल पोलीसांना होताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान खुन झाल्याची माहिती शहरात पसरताच अनेकांनी पोलीस स्टेशन आणि उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली.
दरम्यान घडलेला घटनाक्रम, मोबाईल वरील स्टेटस आणि इतरांना दिलेल्या धमकीमूळे बौध्द समाज बांधवांनी रितीकचे मारेकरी येथील वार्ड न. १४ आणि १५ परिसरातील काही युवक असल्याचे सांगून त्यांच्या अटकेची मागणी केली. मारेक-यांना जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत शवविच्छेदन होणार नाही अशी मागणी उचलून धरली परंतू मध्यस्थीनंतर पोलीसांनी वातावरण शांत केले. पोलीस स्टेशन मूल येथे अज्ञात मारेकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.
अज्ञात मारेक-यांचा शोध वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकासोबतचं पोलीसांचे वेगवेगळे पथक कसुन घेत आहेत. ऋतीक शेंडे या (Mool Murder Case) युवकाची हत्या होण्यामागील कारण कळू शकलेले नाही. मूलचे ठाणेदार सुमीत परतेकी सध्या रजेवर आहेत. त्यामूळे प्रभारी ठाणेदारांच्या खांद्यावर तपासाची धुराआली आहे. मृतक ऋतीक Dૠતાવ अनिल शेंडे य याचे विरूध्दही पोलीस स्टेशन येथे वेगवेगळ्या पाच गुन्ह्यांची नोंद आहे.
मुल कडकडीत बंद, रस्तारोको आंदोलन
मुल: येथील ऋतीक शेंडे या युवकाचा काल रात्री झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज शुक्रवारला संपूर्ण मुल शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला. मुलच्या नागरिकानी बंद ठेवण्यामध्ये सहकार्य केले. यामधे व्यापारी बांधवांनी आपापले दुकाने व प्रतिष्ठाने सकाळ पासूनच बंद ठेवली. ऋतीकच्या हत्येने (Mool Murder Case) मूल शहरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माणझाली असून शहरातील कायदा व सुवव्यस्थेवर सामान्य नागरिक टिका करीत आहेत, दरम्यान बौध्द समाज बांधवांनी व मृतकाच्या नातेवाईकांनी ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी मृतकाचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन रास्तारोको आंदोलन केल्याने काही काळ चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
तीन आरोपींना अटक, एक जण फरार
मूल येथे ऋतीक शेंडे या तरूणाच्या हत्येप्रकरणी मूल पोलिसांनी अज्ञात आरोर्पी विरोधात कलम १०३(१), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून तपास कार्य वेगाने सुरू केले. खुनाचे गुन्हयातील आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे विविध पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आले. दरम्यान या (Mool Murder Case) प्रकरणातील आरोपींना चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली.
या (Mool Murder Case) हत्याकांडातील आरोपींमध्ये मुख्य आरोपी नामे राहुल सत्तन पासवान (२०), व त्याचा साथीदार आरोपी अजय दिलीप गोटेफोडे, (२२) दोघेही राहणार बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं. १५, मुल, व विधीसंघर्षित बालक अश्या तिघांना आज शुक्रवार दि. २८ डिसेंबरला चंद्रपुरातून अटक करण्यात आली. आरोपींना पोलीस स्टेशन मुल यांचे ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तपासादरम्यान आरोपी वाढण्याची शक्यता आहे.