परभणी(Parbhani):- आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत मुस्लिम बहुल मतदार संघात (Muslim majority constituencies) अधिकाधिक मुस्लिम उमेदवार द्यावे या मागणीसाठी मराठवाड्यातील शिष्टमंडळाने गुरुवार १९ सप्टेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात खा. शरद पवार यांची भेट घेतली.
मराठवाड्यातील शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट
महाराष्ट्र राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सुमारे १५० पेक्षा अधिक मौलानांनी परभणी येथील मौलाना जहीर अब्बास कासमी यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्षाच्या मुस्लिम पुढाऱ्यांसोबत गुरुवार रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेत वक्फ बोर्ड बिलासह विशालगड प्रकरण व बाबा रामगिरी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल चर्चा करत मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असलेल्या मुस्लिम बहुल मतदार संघात मुस्लिम उमेदवार देण्याची विनंती केली. तेंव्हा वक्फ बोर्डासंबंधी आलेले बिल आम्ही संसदेत पारित होऊ देणार नाही असा शब्द देत मुस्लिम समाज बांधवांनी संपूर्ण ताकदीनीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहण्याचे आवाहन खा. शरद पवार यांनी केले. या शिष्टमंडळात मौलाना जहीर अब्बास कासमी यांच्यासह मा.आ. एम.एम. शेख, माजी नगराध्यक्ष मोईज शेख, शेख इब्राहिम, मौलाना जहांगीर खुद्दुस मिल्ली, जावेद आसेफ आदींची प्रमुख उपस्थिती होती.