परभणी/जिंतूर (Parbhani):- भगरपीठ खाल्ल्याने ३५ पेक्षा जास्त नागरीकांना विषबाधा झाली. हा प्रकार शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथे घडला. विषबाधा (Poisoning) झालेल्या १२ जणांना उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांवर खाजगी रुग्णालयात (Private hospitals) उपचार सुरू आहेत.
ग्रामीण, खाजगी रुग्णालयात उपचार
पुंगळा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी रात्री तसेच शुक्रवारी सकाळी भगरपीठ खाल्ले होते. यानंतर काही जणांना मळमळ होऊन उलट्या आणि संडासचा त्रास जाणवू लागला. त्रास जाणवणार्यांना उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्चना विष्णू देशमुख, गुलाब नारायण मोरे, लक्ष्मीबाई गुलाबराव मोरे, उमा बापुराव मोरे, अमोल अच्युतराव देशमुख, वैष्णवी विष्णू देशमुख, राणी राजेभाऊ देशमुख, राजेभाऊ देशमुख, आकाश आच्युतराव देशमुख, इषिता राजेभाऊ देशमुख, रक्षिता राजेभाऊ देशमुख, कोमल राजेभाऊ देशमुख यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.