heavy rain:- आसाममधील पूरस्थिती (Assam Floods 2024) अजूनही गंभीर आहे. रविवारी आणखी तीन मृत्यूची (Deaths)नोंद झाली, जरी बाधित लोकांच्या संख्येत किरकोळ घट झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, 13 जिल्ह्यांतील 5,35,246 लोक अजूनही पुरामुळे प्रभावित आहेत. शनिवारी 10 जिल्ह्यांमध्ये बाधित लोकांची संख्या 6,01,642 होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील विविध भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली, त्यामुळे अनेक भागातील बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. पुरामुळे हैलाकांडी होजई, मोरीगाव, करीमगंज, नागाव, कचार, दिब्रुगढ, गोलाघाट, कार्बी आंगलाँग पश्चिम आणि दिमा हासाओ जिल्ह्यात एकूण 6,01,642 लोक बाधित झाले आहेत.
पूर आणि वादळातील मृतांची संख्या 15 वर पोहोचली
अधिकाऱ्यांनी सांगितले की, 28 मे पासून पूर(flood) आणि वादळामुळे (storm) मृतांची संख्या 15 झाली आहे. नागावमध्ये 2.79 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत, तर होजईमध्ये 1,26,813 आणि कचरमध्ये 1,12,265 लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील 40,000 हून अधिक लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
बचाव आणि मदतकार्य सुरू आहे
एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन (Local administration) आणि सर्वसामान्य नागरिकांकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. त्याचवेळी मणिपूरमध्ये अतिवृष्टीमुळे(heavy rain) आलेल्या पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून मदत साहित्य पुरवण्यात आले आहे. लष्कराचे स्पिअर कॉर्प्स आणि आसाम रायफल्सचे जवान मदत आणि बचाव कार्यात (Rescue operations) गुंतले आहेत. रविवारी खुमेन, लम्पक, नागराम आणि इंफाळ शहरातील सुमारे अडीच हजार लोकांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.