हिंगोली (Mother Death) : शहरातील देवडानगर भागामधील वयोवृद्ध मातेचे निधन १४ डिसेंबरला झाले. त्यांच्या चार मुलींनी चोहोबाजूनी खांदा देऊन अंत्यसंस्कार केले. हिंगोली शहरातील देवडानगर भागामधील अयोध्याबाई मुरलीधर अग्रवाल (बरूडवाले) (८८) यांचे १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री ३.३० च्या सुमारास निधन झाले. अयोध्याबाई यांना चार मुली आहेत.
देवडानगर भागामधून काढण्यात आलेल्या (Mother Death) अंत्य यात्रेत देवकी श्रीनिवास अग्रवाल (अकोला), पार्वती अनिल अग्रवाल (बोधवड खान्देश), संतोष उमेश मोर (हिंगोली), मंगल गोपाल मोर (दारव्हा डिग्रस विदर्भ) या चारही मुलींनी चोहोबाजूनी खांदा दिला. कयाधू नदीच्या तिरावर चारही मुलींनी अंत्यसंस्कार केले. अंत्यविधी प्रसंगी अनेक नागरिकांची उपस्थिती होती. अयोध्याबाई अग्रवाल यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंड, दीर काशिराम अग्रवाल, सिताराम अग्रवाल बरूडवाले असा परीवार आहे.
राजस्थानी समाजातील महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीत (Mother Death) अंत्यविधी प्रसंगी उपस्थित राहण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. मयत अयोध्याबाई यांचे पती स्व.मुरली शेठ अग्रवाल यांचे लोकशाही टी-हाऊस त्यांच्या काळात सर्वात लोकप्रिय हॉटेल होते.