मुंबई (Munjya’ movie): सध्या ‘मुंज्या’ चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. शुक्रवारी, 7 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित (Displayed) झालेला हा चित्रपट (Movie)चांगलाच कमाई करत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित (Directed) ‘मुंज्या’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कथा आणि VFX ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई करत आहे. मोना सिंग, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची भूमिका असलेला हॉरर चित्रपट ‘मुंज्या’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित (Directed) मुंज्या हा मॅडॉकचा स्त्री, रुही आणि भेडिया नंतरचा चौथा चित्रपट आहे. मुंज्याच्या कथेभोवती चित्रपट फिरतो.
हा (Munjya’ movie) चित्रपट भारतीय लोककथेवर आधारित आहे. चित्रपटाने दमदार ओपनिंग केली होती. यानंतर या चित्रपटाने वीकेंडमध्ये चांगलीच कमाई केली आहे. ‘मुंज्या’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 81.25 टक्क्यांनी वाढ झाली असून त्याने 7.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता चित्रपटाच्या रिलीजच्या तिसऱ्या दिवसाच्या म्हणजेच रविवारी कमाईचे आकडे आले आहेत. माहितीनुसार, ‘मुंज्या’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 7.75 कोटी रुपये कमवले आहेत.
‘मुंज्या’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 19 कोटींवर पोहोचले आहे.’मुंज्या’ बनवण्यासाठी निर्मात्यांनी 30 कोटी रुपये खर्च केले आहेत. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत निम्म्याहून अधिक बजेट जमा केले आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 19 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला, तर आठवडा (week) पूर्ण होण्याआधीच चित्रपटाची बजेटची रक्कम वसूल होईल, असे दिसते.
चित्रपटाची कथा कोकणातील लोकप्रिय असलेल्या मुंज्याच्या दंतकथेवर आधारित आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कोकणात झाले आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात सुहास जोशी, मोना सिंग, अजय पोकळकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे यांच्या भूमिका आहेत. आता एकही मोठा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसतानाही त्याचा फायदा ‘मुंज्या’ला होताना दिसत आहे.