हिंगोली(Hingoli):- खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल हिंगोलीत शुक्रवारी भाजप तर्फे निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले.
हिंगोलीत शुक्रवारी भाजप तर्फे निषेध नोंदवून आंदोलन
हिंगोली जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) वतीने आज दि. 13/09/2024 रोज शुकवार रोजी सकाळी 10:30 वाजता. हिंगोली येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत (America)आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा जाहिर निषेध करून आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष दिवाकर माने, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे , मिलिंद यंबल, माजी नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ, रजनी पाटील, मंदाकिनी चव्हाण, प्रशांत गोल्डी,हमीद प्यारेवाले, राजेश अग्रवाल, शाम खंडेलवाल, उमेश गुठे, जीतसिंग साहू, के.के.शिंदे , दुर्गादास साकळे,उमेश नागरे, कैलास शहाणे, शिवानंद होकर्णे, जय धोंडे,दत्ता गायकवाड,रामेश्वर सोनुने, सुभाष कांबळे,रवी शिखरे,गोविंद जाधव,सुरेश वाढे,चंद्रकांत चाटसे, युवामोर्चा अध्यक्ष पप्पु चव्हाण, अनु. जमाती अध्यक्ष विठ्ठल घोगरे,सचिन शिंदे, ओबिसी मोर्चा अध्यक्ष पुरूषोत्तम गडदे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.