पुसद (MP Sanjay Deshmukh) : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख (MP Sanjay Deshmukh) यांनी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी राजू वाकडे (Raju Wakade) यांच्या निवासस्थानी दि. 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान सदिच्छा भेट दिली. काही दिवसा अगोदर राजू अण्णा वाकडे यांच्या मातोश्री यांचे वयोमानानुसार दुःखद निधन झाले होते. मात्र खासदार महोदय हे दिल्ली येथील कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळे ते त्यावेळी उपस्थित राहू शकले नाही.
मात्र काल वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसी ची मीटिंग अटेंड करून ते पुसद मार्गे दिग्रस कडे कडे निघाले. या दरम्यान विशेष करून ते जय नगर येथील शिवसेना पदाधिकारी राजीव अण्णा वाकडे यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्यासमवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष करून खासदार संजय देशमुख (MP Sanjay Deshmukh) यांनी अत्यंत जिव्हाळ्याने राजू अण्णा वाकडे (Raju Wakade) यांच्या कुटुंबाशी वार्तालाप केला.
याप्रसंगी त्यांची भेट घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलचे अध्यक्ष एड आशिष दादा देशमुख, दैनिक देशोन्नती चे प्रतिनिधी दीपक महाडिक, साहेबराव ठेंगे, नाना जळगावकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुसद विधानसभा संपर्कप्रमुख विशाल जाधव, विधानसभा सहसंघटक विजय बाबर, जिल्हा समन्वयक रंगराव काळे, महिला पदाधिकारी पोहरकर, शहर प्रमुख हरीश गुरुवाणी, पदाधिकारी मोहन विश्वकर्मा, पिंटू मस्के, विजय वानखेडे, राजू अण्णा वाकडे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य महिला सदस्य बंधू यांच्यासह शेजारी राहणारे खासदार संजय देशमुख यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.