पुसद (MBBS Mrunal Ade) : ओम नगर निवासी भोपाल सिंग आडे यांची सुकन्या पुसदची लाडली लेक कु. मृणाल आडे (Mrunal Ade) या मुलीने अत्यंत संघर्ष करीत चिकाटी व धाडस व वडीलधाऱ्यांचा गुरुजनांचा आशीर्वाद मार्गदर्शन याच्या जोरावर परदेशातून वैद्यकीय पदवी एमबीबीएस (MBBS) पूर्ण करून देशासह पुसदच्या नावामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या लाडली मुलीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. शहरातील व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी तिच्या निवासस्थानी जाऊन तिचे स्वागत केले. तिनेही भारावून जाऊन हे यश मी माझ्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनात गुरुजनांच्या आशीर्वादाने व वडीलधाऱ्यांच्या पुण्याइने संपादन केल्याचे दैनिक देशोन्नतीला सांगितले हे विशेष.