परभणी(Parbhani):- जिल्हा रुग्णालयात माथेफिरू कडून डॉक्टरांवर वेळोवेळी होणारा हल्ला ,तसेच बऱ्याच वेळा रुग्णालयात काही अज्ञात लोकांकडून होणारे हल्ले, रुग्णालयाची होणारी तोडफोड अशा असंख्य घटना जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षक नसल्याने होत होत्या.आता यावरती आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आता तैनात करण्यात आले आहे. यामध्ये काही जवान रायफलधारी तर काही महिला व पुरुष सुरक्षा जवान आहेत .यामधे वरिष्ठ अधिकारी, अधिकारी असे सर्व पाहता ४६ कर्मचारी बंदोबस्ताकरिता शासकीय रुग्णालयातील (Government hospitals) महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला…
एक गृहखात्याच्या भाग म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (MSF) आणि ते मुख्यत्वे; रुग्णालयातील डॉक्टर ,कर्मचारी ,रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. त्यामुळे ते मेडिकल कॉलेज (Medical College)अपघात क्षेत्र , आय सी यु, महिला प्रस्तुती वॉर्डमध्ये पाळत ठेवतात. त्यांना रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर व रुग्णालय कर्मचारी यांच्यावर होणारे संभाव्य हल्ले, परिसरातील चोऱ्या. अश्या विविध प्रकारे संभावे हल्ले रोखायचे असल्याने हे जवान अशी कोणतीही परिस्थिती अगदी सहजपने हाताळत असतात. म्हणून जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स (Security Force)मधील जवानांना कोणतेही वॉरंट नसताना संबंधित संशयित इसमास व गुन्हेगारास अटक करण्याचे अधिकार बहाल केलेले आहेत. तसेच शस्त्र चालवण्याचे अधिकारही आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रयत्नांना यश
या जवानांना ब्रिफ करण्यासाठी, अधिष्ठाता डीन डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लखमावार ,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सारिका बडे यांचे मार्गदर्शन असून आता डॉक्टर व रुग्णालय कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता सुटलेला दिसून येत आहे. कलकत्ता येथे झालेल्या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन रुग्णालय प्रशासन सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या बाबतीत अतिशय सतर्क झाले आहे. महाराष्ट्र सुरक्षा फोर्स चे इंचार्ज अरुण बोराटे रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी आता तत्पर आहेत.