केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आ. डॉ. राजेंद्र शिंगणेंनी साखरखेर्डा येथे भेट देऊन परिस्थितीचा घेतला आढावा
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Muharram festival) : मोहरम मिरवणूक शेवटच्या टप्प्यात असताना अचानक दगडफेक झाल्याने १० ते १२ व्यक्ती जखमी झाले. या दगडफेकीत पोलीस वाहनाचेही नुकसान झाले असून, दगडफेक, दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी ३४ युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी ११ युवकांना अटक करण्यात आली आहे.
शांतता कमेटी सदस्यांची बैठक; दंगलखोरांवर कठोर कारवाईचे आश्वासन
दरम्यान, आज, दि. १९ जुलैला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी परिस्थितीची माहिती घेऊन या दंगलीमागे कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, आणि गावात शांतता प्रस्थापित कशी होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना पोलिसांना केली आहे.