मुंबई(Mumbai):- मुंबईतून आणखी एका अपघाताची(Accident) बातमी समोर आली आहे. कुर्ल्यातील अपघातानंतर आता मुंबईतील सीएसटी परिसरात बेस्टच्या आणखी एका बसने एका व्यक्तीला चिरडले आहे. या हृदयद्रावक घटनेने शहरात पुन्हा खळबळ उडाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला येथे बेस्टच्या बस अपघातात 7 जणांना जीव गमवावा लागला होता. अपघाताच्या प्राथमिक पोलिस तपासात ड्रायव्हरला (Driver)योग्य प्रशिक्षण दिले नव्हते आणि त्याने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याचे समोर आले आहे.
बसमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून टिपलेले फुटेज घेतले ताब्यात
पोलिसांनी सांगितले की, बस चालकाने चुकून ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला, त्यामुळे बसचा वेग वाढला आणि ती अनेक वाहनांना धडकली आणि लोकांना चिरडली. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हर कंत्राटी पद्धतीने काम करत होता आणि तो १ डिसेंबर रोजीच बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (Best Bus) मध्ये रुजू झाला होता. मुंबई पोलिसांनी बसमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून(CCTV Cameras) टिपलेले फुटेज ताब्यात घेतले आहे. फुटेजच्या आधारे, पोलिस प्रवाशांची ओळख पटवतील आणि त्यांची साक्ष या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी म्हणून वापरतील.