शेगाव (Buldhana) :- मुंबई कडून अमरावती येणाऱ्या मुंबई – मरावती एक्सप्रेसला (Mumbai – Maravati Express) नाशिक बोदवड रेल्वे क्रॉसिंग जवळ अपघात झाल्याची घटना 14 मार्च रोजी पहाटे पाच वाजता दरम्यान घडली. सदर अपघातात (Accident) एकही प्रवासी जखमी झालेले नसून या अपघातामुळे रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
माल घेऊन जाणारा ट्रक रेल्वे रुळावर आडवा आल्याने सदर एक्सप्रेसला झाला अपघात
मुंबई- अमरावती आंबा एक्सप्रेस 14 मार्च रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान मुंबई कडून अमरावतीकडे प्रवाशांना घेऊन निघाली असता बोदवड रेल्वे स्थानकाच्या (Railway station) काही अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर (Railway crossing) अचानक माल घेऊन जाणारा ट्रक रेल्वे रुळावर आडवा आल्याने सदर एक्सप्रेसला अपघात झाला. रेल्वेने ट्रकला धडक दिल्याने ट्रकचे तुकडे झाले. अपघात इतका भयंकर होता की संपूर्ण ट्रक क्षतिग्रस्त झाला. अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळतात तातडीने रेल्वे प्रशासनाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सदर अपघातामध्ये एकही प्रवासी जखमी झालेला नसून रेल्वे इंजिनचे नुकसान झाले आहे तर मालवाहू ट्रक पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या शेगाव रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या संपूर्ण गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या सायंकाळपर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्यानंतरच रेल्वे पूर्ववत होतील.