न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले
१०,००० कोटींच्या मानहानीची लढाई जिंकली
मुंबई (Mumbai ) : ‘वॅक्सिन किंग’ अदर पुनावाला, सायरस पुनावाला (Cyrus Poonawala ) व ‘सिरम इन्स्टिट्यूट (‘Serum Institute’) ‘चा खोटा बचाव हा वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने ( Superior Civil Court) फेटाळला असून, खोटे शपथपत्र दाखल करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत, तर अनेकांना गंभीर आजार झाले आहे. तरीसुद्धा सिरम इन्स्टिटयूटने त्यांची लस ही पूर्णतः सुरक्षित आहे असा खोटा दावा करून फसवणुकीने लसीकरण करून जनतेचे जीव धोक्यात आणले. अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’चे वरिष्ठ सदस्य, दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक, शेतकरी नेते लोकनायक प्रकाश पोहरे (Prakash Pohre ) यांनी व संघटनेच्या इतर सदस्यांनी देशभर जनजागृती अभियान राबवून कोव्हीडशील्डच्या जीवघेण्या दुष्परिणामाची माहिती व पुरावे नागरिकांना देऊन अनेकांचे प्राण वाचविले. या अभियानामुळे जवळपास ७० कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी कोरोना लसींचे बूस्टर डोज घेण्यास नकार दिला होता. त्यांनतर देशभरातून संघटनेच्या ३००० सदस्यांनी १०० ते १००० कोटींच्या नोटिसेस सिरम इन्स्टिट्यूटला पाठविल्या. प्रकाश पोहरे यांनी सुद्धा समाजात मानहानी केल्याप्रकरणी आदर पुणावाला व त्याच्या कंपनीला दहा हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठविली होती. त्याला उत्तर न मिळाल्यामुळे पोहरे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. सिरम इन्स्टिट्युटने दहा हजार कोटींची नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती करणारी याचिका प्रकाश पोहरे यांनी दाखल केली होती.
आदेशानुसार आता प्रकाश पोहरे यांना 10,000 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणे जवळपास निश्चितच झाले
आता ‘सिरम इन्स्टिट्यूट’चा दावा खोटा सिद्ध झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे ( ‘Tiscon Realty, 2023 SCC OnLine Bom 1154’) प्रकरणातील आदेशानुसार आता प्रकाश पोहरे यांना 10,000 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणे जवळपास निश्चितच झाले आहे, अशी माहिती प्रकाश पोहरे यांचे वकिल व इंडियन बार एसोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. निलेश ओझा ( Adv. Nilesh Ojha ) यांनी दिली. ‘सिरम इंस्टीट्यूट इंडिया लिमिटेड’, अदर पुनावाला व सायरस पुनावाला यांना वरिष्ठ न्यायालयाने ‘फ्रॉड’ घोषित केले आहे. नागपूरच्या वरिष्ठ न्यायालयाच्या या आदेशामुळे आता ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’च्या देशभरातील सर्व सदस्यांना नुकसान भरपाई मिळणे सोपे झाले असून या महिन्यात देशभरात असे 1500 दावे व फौजदारी केसेस आणि येत्या काळात हजारो केसेस दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’चे राष्ट्रीय समन्वय समिती सदस्य अंबर कोईरी यांनी दिली.