नवी मुंबई (Mumbai Fire) : कोपरखैरणे सेक्टर 6 या ठिकाणी भीषण आग लागली. हा रास्ता रहदारीचा असल्यामुळे लहान मुले, महिला भगिनी ये-जा करत असतात. या ठिकाणी (Terrible Explosion) भयानक विस्फोट होऊन ही आग लागली. आग लागलेल्या ठिकाणी साहित्य जळून खाक झाले. मात्र सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही.
या ठिकाणी अशा अनेक डीपी खराब आहेत किंवा अजून अद्रुस्त आहेत. अशा वेळेला पाऊस पडल्यामुळे, कदाचित (Short circuit) शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ एमएसईबीच्या वायरमेन श्रीकांत आणि अधिकारी यादव साहेबांनी सहकार्य केले. ही आग आटोक्यात आली असून, आता त्वरित ते काम सुरु करण्यात येत आहे.
स्थानिक लोकांकडून विनंती आहे की, पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची घटना कुठे घडू नये आणि कुठलीही जीवित हानी होऊ नये. येणारा पावसाळा लक्षात घ्यावा, वादळी पाऊस होतोय आणि या सगळ्या गोष्टीमुळे कदाचित (Mumbai Fire) अशा पद्धतीचा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. म्हणून शक्य ती काळजी एमएसईबीने घ्यावी, अशी विनंती जनतेकडून करण्यात आली आहे.