मुंबई (Mumbai Hit and Run) : वरळी बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील (BMW Hit and Run) आरोपी मिहीर शाहचे वडील राजेश शाह यांना शिवसेनेने (शिंदे गट) पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानंतर शाह यांना पदावरून हटवण्यात आले आहे. मिहीर शाह हा एकनाथ शिंदे गटामधील शिवसेना नेते राजेश शाह (Rajesh Shah) यांचा मुलगा आहे. अपघात झाल्यापासून लपून बसलेल्या मुंबईजवळच्या विरार येथील रिसॉर्टमधून मिहिरला (Mumbai Police) अटक करण्यात आली.
ओळख लपवण्यासाठी दाढी काढली
शनिवारी रात्री जुहू येथील बारमधून बाहेर पडताना (Mihir Shah) मिहिरला दाढी होती, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र, त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो क्लीन-सेव्ह झाला. त्याने आपली ओळख लपवण्यासाठी दाढी काढली असावी, असा तपास अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. त्याने आरोपीने कबुली दिली की, तो (BMW Hit and Run) बीएमडब्ल्यू चालवत होता. ज्याने एका स्कूटरला धडक दिली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. चौकशीदरम्यान मिहीरने जीवघेण्या अपघातापूर्वी केलेल्या कृती आणि त्यानंतर काय घडले, याची सविस्तर माहिती दिल्याचे (Mumbai Police) पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
मिहीर शाहची कबुली
माहितीनुसार, मिहीरची संध्याकाळ जुहू येथील तापस बारमध्ये सुरू झाली, जिथे त्याने मित्रांसोबत पार्टी केली. हाजी अलीजवळील मरीन ड्राईव्हवर बीएमडब्ल्यू नेण्यापूर्वी तो आपल्या मित्रांना मर्सिडीजमध्ये घरी घेऊन गेला, त्याने कथितपणे त्याच्या ड्रायव्हरसोबत जागा बदलल्या आणि स्वतः गाडी चालवायला सुरुवात केली. त्याने कबूल केले की, तो आलिशान कार चालवत होता, जेव्हा त्याने स्कूटरला धडक दिली आणि (Mumbai Hit and Run) पीडित कावेरी नाखवा हिला सुमारे 1.5 किमी खेचले. त्यानंतर पीडितेचा मृतदेह रस्त्यावर टाकून तो पळून गेला.
CM शिंदे यांनी कडक कारवाईचे आश्वासन
मुंबई हिट-अँड-रन प्रकरणामुळे (Mumbai Hit and Run) संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिट-अँड-रन प्रकरणांमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.