विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी
मुंबई (Vijay Vadettiwar) : काल झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rains) मुंबईची तुंबई झाली. नालेसफाई न केल्याने पाणी रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावर साचले. नागरिकांचे प्रचंड हाल झाले. निवडणुका न झाल्याने आता मुंबईत लोकप्रतिनिधी नाहीत. त्याचा फटका बसला आहे. याचा अर्थ नालेसफाईसाठी खर्च केलेले शेकडो कोटी रूपये पाण्यात गेले आहे. याप्रकरणाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी स्थगनच्या माध्यमातून विधानसभेत केली आहे.
मुंबईची तुंबई का झाली;नालेसफाईत मोठा भ्रष्टाचार
चंद्रपूर बल्लारशाह शहरात दिवसा ढवळ्या (Chandrapur blast) पेट्रोल बाँम्ब टाकण्यात आला. कट्ट्याचा वापर करून गोळीबार (Amravati firing) केला गेला. यामध्ये दुकान जळाले, व्यक्तीच्या पायाला गोळी लागली. तडीपार गुंडाने हा हल्ला केला. आठ दिवसापासून ही व्यक्ती शहरात फिरत असल्याची माहिती पोलीसांना होती. तरी देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधासनभा विरोधी पक्षनेते (Vijay Vadettiwar) वडेट्टीवार यांनी केली.
अमरावतीत देखील गोळीबार झाला झाला. मुंबईत हिट अँड रनच्या (Mumbai hit and run) घटना सतत घडत आहेत. मिहिर शहा नावाच्या व्यक्तीने भरधाव गाडीखाली एका महिलेला चिरडले. संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे या प्रकरणांची देखील चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी (Vijay Vadettiwar) वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.