मानोरा(Washim):- बंजारा समाजाची काशी पोहरादेवी ते कल्याण मुंबई ही विठ्ठलवाडी आगाराची बस मागील आठ वर्षापासून चालू असून मध्यंतरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही बससेवा त्या कालखंडात बंद करण्यात आली होती. कालांतराने ती गाडी पूर्ववत सुरू करण्यात आली. यानंतर ही गाडी कल्याण ते वाशिम इथपर्यंतच चालवण्यात येत होती. आता दिवाळी सणानिमित्त(Diwali festival) तिर्थक्षेत्र पोहरदेवी पर्यंत बस सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन विभागीय नियंत्रक यांना प. स. सदस्या सौ छायाताई मनोहर राठोड यांनी पाठविले आहे.
विठ्ठलवाडी एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांना निवेदन
दिपावलीत ग्रामीण भागातील मुबई, पुणे, औरंगाबाद याठिकाणी कामानिमित्त गेलेली गोरगरीब मजूरवर्ग, नोकरदार मंडळी यवतमाळ वाशिम जिल्ह्यात ये – जा करतात. यवतमाळ वाशिम या दोन्ही जिल्ह्यासाठी पोहरादेवी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे मुबई कल्याण ते पोहरादेवी ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, असे निवेदन विभागीय नियंत्रक यांना प. स. सदस्या सौ राठोड यांनी पाठविले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी तहसीलदार, आगार नियंत्रक मानोरा यांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले आहे.