Taarak Mehta Ka Ulta Chashma:- तारक मेहता का उल्टा चष्मा हा 2008 मध्ये सुरू झालेला सर्वात लोकप्रिय टीव्ही शो (TV Show)आहे. या शोला अनेक अभिनेत्यांनी अलविदा म्हटले असले तरी आता १६ वर्षांनंतर आणखी एक पात्र या शोला अलविदा करणार आहे. गोलीची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहने हा निर्णय घेतला आहे.
शोमधून बाहेर पडताना गोली भावूक झाला
कुश शाहने या शोबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा व्हिडिओ (video)शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा शो सुरू झाला तेव्हा मी लहान होतो. तुम्ही आणि या कुटुंबाने मला खूप प्रेम दिले आहे. मी येथे अनेक आठवणी बनवल्या आहेत आणि मी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आहे. तसेच मी माझे बालपण (childhood)या शोमध्ये घालवले आहे. या प्रवासासाठी मी असित मोदींचा आभारी आहे,
या स्टार्सनी शोचा घेतला निरोप
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो 2008 पासून टीव्हीवर राज्य करत आहे. दिशा वकानी, भव्य गांधी, गुरुचरण सिंग, शैलेश लोढा, नेहा मेहता, जेनिफर मिस्त्री आणि टप्पूची भूमिका करणारे राज उंडक यांनीही शो सोडला आहे.