मानोरा (Mundan Andolan) : महाराष्ट्र राज्य का. विनाअनुदानित शाळा कृती समिती, खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, अनुदानित, मुख्याध्यापक संघ ,शिक्षक समन्वय संघ यांचे वतीने १२ ऑगस्ट रोजी मुंडन आंदोलन (Mundan Andolan) करण्यात आले होते. मुंडण केलेले केसांचे अर्पण शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी करण्यात आले. अंशतः अनुदानित शाळांना अनुदान व टप्पा वाढ द्यावी, तसा शासन आदेश तात्काळ काढावा, पुणे स्तरावर अघोषित शाळांना घोषित करून अनुदान द्यावे, जूनी पेन्शन योजना लागू करावी, अंशत: अनुदानित शिक्षक व चतुर्थ कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम लागू करणे.
अंशतः अनुदानित शाळा मधील शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे, आदी मागण्यासाठी अमरावती विभाग येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर दिनांक १२ऑगस्ट रोजी भव्य आक्रोश मोर्चा व मुंडन आंदोलन करण्यात आले होते तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी तसेच १५ ऑगस्ट २०२४ रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय, अमरावती आणि १६ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे चक्रीय आंदोलन (Mundan Andolan) करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन (Mundan Andolan) करण्यात आले. या वेळी कृती समितीचे विभागीय संघटक उपेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष राजीक पठाण, सचिव सुनील डहाके, प्रसिध्दी प्रमुख अजय वाणे,अमोल हाडके, रुपराव वानखडे, चंद्रकांत कथे, अतुल गाडगे, संदेश भारसाकळे, योगेंद्र नेताम, सिद्धार्थ शिरसाट, पुरुषोत्तम कळसकार, गजानन ठाकरे ,विजय कळसकर ,राजाभाऊ खंडारे ,अतुल इंगळे आदी उपस्थित होते. शासनाने आमचा अंत न पाहता तात्काळ अनुदानाच्या आदेशाचा जी.आर. काढावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.