नांदेड (Mundan Andolan) : अशंता आणि विना अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना शंभर टक्के हक्काचे वेतन मिळावे, यासाठी मागील १५ दिवसापासून शिक्षकांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. परंतू याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी राज्यसरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समन्वयक समितीच्यावतीने ‘मुंडन आंदोलन’ (Mundan Andolan) करून सरकारचा निषेध करण्यात आला.
राज्यातील अंशता आणि विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांना १ जानेवारी २०२४ पासून विना अट प्रतीवर्षी वाढीव टप्पा लागू करावा, ९ नोव्हेंबर २०२३ रोजी शिक्षणमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. राज्यातील विभागीय स्तरावरील घोषीत शाळांना अनुदानास पात्र करावे. यासह इतर विविध मागण्यासाठी हे आंदोलन नांदेडमध्ये मागील १५ दिवसापासून सुरू आहे.