वाशिम (Municipal Corporation) : पावसाळा डोक्यावर येऊन ठेपला आहे. यावर्षी (heavy rain) पाऊस लवकर येईल, जिल्हाभरातील मानसूनपूर्व कामे हातावेगळी होणे अपेक्षित होते. मात्र, (Municipal Corporation) प्रशासनाच्या उदासीनतेतूनच मान्सूनपूर्व कामांच्या शुभारंभाला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. परिणामी, जनतेच्या आरोग्यासह जीवनाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरात लहान-मोठे अनेक नाले आहेत.
शहरातील नाल्यांचा श्वास गुदमरतोय
या नाल्यांमधून पावसाचे तसेच वेगवेगळ्या भागातील घरगुती व व्यवसायिक प्रतिष्ठानांमधील पाणी शहराबाहेर काढण्याची सुविधा होते. मात्र,आजमितीस शहरातील बहुतांश नाल्यांमध्ये बेशरमची झाडे, गाजर गवत तसेच वेगवेगळ्या झाडांचे स्तोम माजलेले आहे. त्यात भरीस भर म्हणून की काय? शहरातील व्यवसायिक प्रतिष्ठानांमधील कचरा, प्लास्टिक व इतर साहित्य या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याचे वास्तव आहे.( Municipal Corporation) नैसर्गिक व मानवनिर्मित अतिक्रमणाने सद्यस्थितीत शहरातील नाल्यांचा श्वास गुदमरत असल्याने त्यातून पावसाचे पाणी कसे वाहून जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रहिवाशांचे जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता
उल्लेखनीय म्हणजे, पाटणी चौक ते छ. शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गावर एक नव्हे तब्बल तीन नाले आहेत. या तिन्हीही नाल्यांच्या परिसरात नागरी वस्ती व व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. (heavy rain) पावसाळ्यात तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास रहिवाशांचे जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच काहीही स्थिती जुना रिसोड नाका ते बाकलीवाल विद्यालयाकडे जाणारा नाला व पद्मतीर्थकडे जाणार्या नाल्याचीही आहे. या भागातही नागरी वस्ती असल्याने शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करून झाडे झुडपे काढून टाकावित, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.
धूर फवारणी करणे गरजेचे
बेशरमची झाडे, गाजर गवत, प्लास्टिक मटेरियल आणि इतर तत्सम कचर्याने शहरातील नाले गच्च झालेले आहेत. तर नाल्यांचीही अत्यंत दयनीय अवस्था असून, त्या तुडुंब भरलेल्या आहेत. तर दुसरीकडे पावसाळा डोक्यावर आहे. अशा स्थितीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरण्यास पोषक वातावरण ठरू शकते. त्यातून डास व मच्छर यांचे प्राबल्य वाढून वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Municipal Corporation) संभाव्य शक्यता लक्षात घेता शहरात धूर फवारणी करणे गरजेचे झाले असल्याचे बोलले जात आहे.
तुंबलेल्या नाल्या दुर्लक्षितच
पावसाळा (heavy rain) डोक्यावर येऊन थांबला असतानाही शहरातील अनेक भागात नाल्या तुंबलेल्या आहेत. नाल्यांची नियमित स्वच्छता नसल्यानेच तुंबल्या आहेत. त्यामुळे डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असून, एैन पावसाळ्यात वेगवेगळे आजार बळावण्याची शक्यता असल्याने न. प. प्रशासनाने तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करावी,अशी मागणी जोर धरत आहे.