पुसद (Electricity department) : शहरातील अनेक भागात तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या जवळून जात असलेला डीपी रोड व पुढे बाजू रोडला जोडला जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या थैमानाने (municipal council) नगरपरिषद पुसदच्या विद्युत विभागामार्फत बसविण्यात आलेले पथदिवे बंद झाले होते. तर परिसरात केबल टाकणाऱ्या कंपनीने जेसीबीने खोदकाम केल्यामुळे रस्त्यावर मातीचे ढिगारे पडले होते . रस्त्यावर अंधार व चिखलाचे साम्राज्य पसरले होते.
परिसरात नागरी वस्तीसह एक खाजगी मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Multispeciality Hospital) असून या ठिकाणी लांबून येणाऱ्या रुग्णवाहिका व रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना त्यासोबतच या भागातील नागरिकांना व या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर मंडळी व कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास जाणवत होता. या संदर्भात दैनिक देशोन्नतीने पुसद न प विद्युत विभागाचे (Electricity department) कर्मचारी सतीश शिनगारे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांची भेट घेऊन वरील प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांनी तातडीने यासंदर्भात दखल घेत या परिसरातील पथदिवे सुरू करण्याचे काम तातडीने हाती घेऊन सुरू केले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांसह सर्वांचाच त्रास वाचणार आहे हे विशेष.