सील उघडण्याची परभणी मनपाची जबाबदारी
परभणी (Municipal swimming pools): थकबाकीपोटी महापालिकेने परभणी (Parbhani Municipal) येथील जलतरणिकेला सील ठोकले होते. या नंतर संबंधित जलतरणिका चालकाने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशाने सात लाख रुपये जमा केले. जलतरणिकेचे सील खोलण्याची जबाबदारी महापालिकेची असताना अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. (swimming pools) जलतरणिका चालकाने सील खोलण्या विषयी मनपा आयुक्तांना दोन वेळेस निवेदन देत विनंती केली आहे.
मनपा प्रशासनात कोणतीही कार्यवाही नाही
शहर महापालिकेच्या मालमत्ता विभागाने जलतरणिकेकडे असलेल्या थकबाकीपोटी मंगळवार १४ मे रोजी जलतरणिकेला सील लावले. यानंतर जलतरणिका चालकाने न्यायालयामध्ये दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशाने सात लाख रुपये जमा केले. यानंतर (Parbhani Municipality) महापालिकेने जलतरणिकेचे सील उघडणे अपेक्षित होते. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे जलतरणिका चालकाचे आर्थिक नुकसान होत आहे. सील उघडण्याविषयी दिलीप मोरे यांनी मनपा प्रशासनाला दोन वेळेस निवेदन देत मागणी केली आहे. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
आठ लाखांचे नुकसान
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमान ४५ अंशावर जावून पोहोचले आहे. गरमी पासून दिलासा मिळावा यासाठी नागरीक पोहण्याचा आनंद लुटतात. ऐन हंगामात जलतरणिकेला महापालिकेने सील ठोकण्याची कारवाई केली. त्यामुळे (swimming pools) जलतरणिका चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास आठ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.