परभणी (Municipality election) : शहर महापालिका (Parbhani Municipality) सभागृहाची मुदत संपूण १५ मे रोजी दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. मागील दोन वर्षापासून इच्छूक निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. निवडणुका लांबल्याने इच्छूकांचा जीव टांगणीला लागल्याचे दिसत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. (Parbhani Municipality) परभणी जिल्ह्यातीलही स्थानिक स्वराज्य संस्थाची मुदत संपली आहे.
परभणी महापालिका; कधी होतील निवडणुका
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, परभणी शहर (Parbhani Municipality) महापालिकेची मुदत संपली आहे. नव्याने निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र मागील दोन वर्षापासून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. परभणी शहर (Parbhani Municipality) महापालिका सभागृहाची मुदत मे २०२२ मध्ये संपली. त्यानंतर निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती. नगरसेवक बनण्याच्या अपेक्षेने इच्छूकांनी आपापल्या भागामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे कामही सुरू केले. काही इच्छूकांनी तर प्रभागात संपर्क कार्यालयही सुरू केले.
मनपाने जाहीर केली होती प्रभाग रचना
आज ना उद्या निवडणुका होतील, या अपेक्षेने इच्छूक कामाला लागले होते. मात्र पाहता पाहता दोन वर्ष उलटली आहेत. (Parbhani Municipality) मनपा निवडणुकीच्या कोणत्याही हलचाली दिसत नाहीत. राजकीय जाणकारांच्या मते विधानसभा निवडणुकांनंतर सन २०२५ मध्ये महापालिका निवडणुकीला (Election Commission) होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीच्या अपेक्षेने कामाला लागलेल्या इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.
नगरसेवक नसल्याने समस्येत भर
महापालिका प्रशासन (Parbhani Municipality) आणि नागरीकांमधील दुवा म्हणून नगरसेवक काम पाहतात. प्रभागातील विविध विकासाची कामे स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, कचरा संकलन यासह इतर येणार्या अडचणी नागरीक नगरसेवकांपुढे मांडतात. त्या सोडविण्याचे काम नगरसेवक करतो. निवडणुका नसल्याने नगरसेवकांनाही मर्यादा आल्या आहेत. सामाजिक भान म्हणून नगरसेवक नागरीकांची कामे करतआहेत.
भावी नगरसेवकांचा खर्च वाढलानिवडणुकीच्या अनुषंगाने भावी नगरसेवकांनी कार्यकर्ते जवळ केले. तसेच संपर्क कार्यालय थाटले. यावरचा खर्च वाढला मात्र निवडणुका लांबल्या. भावी नगरसेवकांचा खर्च कमी झाला नाही. निवडणुका लांबल्याने महापालिकेचा खर्च मात्र वाचला आहे. सदस्यांना दरमहा देण्यात येणारे मानधन मागील दोन वर्षापासून दिलेले नाही. मानधना वरील खर्चाची बचत झाली आहे.
महापालिकेनेनिवडणुकीच्या (Parbhani Municipality) अनुषंगाने प्रभाग रचना जाहीर केली होती. २५ प्रभाग असलेल्या ७६ सदस्यांची प्रभाग रचना सन २०२२ मध्ये जाहीर करण्यात आली. मात्र सदरची प्रभाग रचना रद्द झाली. (Municipality elections) महापालिकेकडे सद्यस्थितीत तीन सदस्य असलेल्या २५ प्रभागातील ७६ सदस्यांची प्रभाग रचना तसेच ४ सदस्य असलेल्या ६५ सदस्यांची प्रभाग रचना तयार आहे. (Election Commission) निवडणूक आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.