पुसद (Yawatmal) :- शहर पोलीस स्टेशन अंतर्गत नवल बाबा वार्डासमोर रस्त्यावर ९ मे रोजी पैश्याच्या वादातुन सुमित सुरेश पवार या युवकावर चाकूने (Knife) वार करून खून (Murder) केल्याच्या घटनेतील अटकेत असलेल्या आरोपीना येथील मखरे मॅडम यांच्या न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. याघटनेत गंभीर जखमी नितीन तुंडलायत या युवकावर नांदेड येथे उपाचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.(ता.प्र.)
महिलेची गळफास लावून आत्महत्या
नेर (Yawatmal) :- तालूक्यातील कोव्हळा येथे एका ६० वर्षीय महीलेने गळफास लावून आत्महत्या (Suicide)केल्याची घटना आज दूपारी साडेतिन वाजता घडली. बेबीबाई लवसन राठोड (६०) असे या महीलेचे नाव आहे. आज कोणी घरी नसतांना घरात नाँयलाँन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ती मजूरी करायची, आजारपनाला कंटाळली होती यातच तिने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थानी सांगितले. तिच्या मागे पती, दोन मुले, १ मुलगी, नातू असा परिवार आहे. (ता.प्र.)
हॉटेल सोमोरून दुचाकी वाहनाची चोरी
यवतमाळ (Yawatmal) :- ९ मे रोजी रात्री. फिर्यादी राजेश वसंतराव मोगरकर याची अज्ञात आरोपी यांने फिर्यादीचे दुचाकी वाहन क्र. एमएच २९ एपी ५०६५ हिरो होंडा स्प्लेंडर प्रो. काळ्या रंगाची टाकीवर सिल्वर रंगाचा पट्टा असलेली जुनी वपारती किंमत अंदाजे ३५ हजार रुपये हे वाहन आर्णी रोडवरील साहीबा हॉटेल यवतमाळ येथून चोरून (Robbery) नेली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी दारू विक्री करणार्यां महिलांनावर गुन्हे दाखल
यवतमाळ (Yawatmal) :- शहरातील भोसा रोड येथे गावठी दारू विक्री करणार्या महिलांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून दोन्ही महिला कडून गावठी दारू (liquor)जप्त करण्यात आली आहे
यातील दुर्गा सुनील लोणकर रा.भोसा त्याचे जवळ एका प्लास्टीक डबकित ७ लिटर गावठी हा.भ.ची दारू किंमत ७०० रू. अवैध्यरित्या मिळुन आल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. तर याच भागात रहिवासी असलेल्या सुमित्रा चरणदास पाटील रा .भोसा यंच्या जवळ त एका प्लास्टीक डबकित ८ लिटर गावठी हा.भ.ची दारू किंमत ८०० रू. अवैध्यरित्या मिळुन आल्याने सदरचा गुन्हा (Crime) नोंद करून तपासात घेतला आहे.