पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या
हिंगोली(Hingoli):- औंढा नागनाथ पोलिस ठाणे हद्दीतील मुर्तीजापूर, सावंगी शेत शिवारात एका टिनशेडच्या आखाड्यावर पतीने पत्नीचा गळा आवळून खून (Murder by strangulation of wife) केल्याची घटना शुक्रवारी घडली. पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपी पतीला ताब्यात घेतले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubts on character) घेऊन तिचा गळा आवळून खुन केल्याने औंढा नागनाथ पोलिसात आरोपी पती किरण गांगलेवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पती – पत्नीत किरकोळ कारणावरून वाद
नांदेड (Nanded) वसंत नगर भागातील किरण उत्तमराव गांगलेवाड (२८) हा शेतीची कामे करत असल्याने या वर्षी त्याने रुपूर सावंगी शिवारातील शेती बटईने केली होती. सध्या मशागतीचे दिवस असल्यामुळे आपली पत्नी शिवानी गांगलीवाड हीला घेऊन २ मे रोजी रुपूर सावंगी येथे आला होता. शेतातील आखाड्यावर त्याने संसारोपयोगी साहित्यही आणले होते. ३ मे रोजी पती – पत्नीत किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाल्याने किरण गांगलेवाड याने आपली पत्नी शिवानी गांगलेवाडचा दोरी व रुमालाने गळा आवळुन खून केला.
पोलिसांनी तात्काळ जाऊन आरोपीला ताब्यात घेतले
या खूनाची माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी तपासचक्र गतीमान केले. घटनेची माहिती घेतल्या नंतर पती किरणचा शोध घेत असताना तो हिंगोलीत आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लु यांच्यासह राजु ठाकुर, नितीन गोरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांचे पथक शोध घेत असतानाच किरण हा बसस्थानक परिसरात असलेल्या व्यापारी संकुलनामध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ जाऊन त्याला ताब्यात घेतले. मृत महिलेचे शवविच्छेदन (Autopsy) औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या दरम्यान सदर महिला तीन महिन्याची गर्भवती (pregnant) असल्याचे स्पष्ट झाले.
शारीरिक व मानसिक छळ करून गळा आवळून खून
याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिसात मृतकाची आई शोभाबाई माणिकराव खंडेराव राहणार बालाजी नगर हिंगोली नाका नांदेड यांनी रात्री उशिरा औंढा नागनाथ पोलिसात फिर्याद दिली. ज्यामध्ये किरण गांगलेवाड यांनी आपली पत्नी शिवानी गांगलेवाडी चारित्र्याच्या संशयावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ (Physical and mental torture) करून कशाने तरी गळा आवळून खून केल्याचा उल्लेख करण्यात त्यावरून पोलिसांनी आरोपी पती किरण गांगलेवाड याला अटक केली. जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लु यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी. एस राहिरे हे करीत आहेत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांनी भेट दिली.