अर्जुनी/मोर (Murder Case) : तालुक्यातील नवेगाव/बांध पोलीस स्टेशन (Navegaon/Bandh Police Station) अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय उद्यानातील स्वागत कक्षात (forest worker) वनमजुर सुदाम राखडुजी किरसान 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हिलटॉप गार्डनच्या परिसरातील पाण्याच्या टाकीवर इलेक्ट्रिक सर्विस वायरनी गळफास अवस्थेत आढळले. या सबंधाची बातमी दि.03 मे 2024 रोजी प्रथम दै. देशोन्नती ला प्रसिद्ध करण्यात आली.
येथे CLICK करा:- राष्ट्रीय उद्यानात वन कर्मचाऱ्याची हत्या की आत्महत्या?
माहितीनुसार, मृतकाच्या पत्नी आणि मुला-मुलीने (Navegaon/Bandh) नवेगाव/बांध उद्यानातील चौपाटीवर दि. 5 मार्च 2024 ला घडलेल्या एका पुरुष व महिलांच्या अश्लील चाळे व्हिडीओ भोजू माळगाम वन मजुरांनी काढली ती व्हिडीओ व्हायरल कुनी केली विषयी घटनेची माहिती आणि त्यांच्या मृतक वडिलांना मृत्युच्या 2 दिवसा आधी या संबधातुन 4 जणांनी दिलेली धमकी आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करने याबाबद मृतांच्या नातेवाईकांनी सर्व नावा सहित नवेगाव/बांध (Police Station) पोलीसांना 21 एप्रिल 2024 रोजी माहिती दिली तर दि.06 मे 2024 रोजी मृताचे कुटुंबीयांना पोलीस स्टेशन ला 12:00 वाजता बोलाविण्यात आले आणि रात्री 9:00 वाजता पर्यंत चौकशी व बयान नोंदवुन दोन आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता 1860 अन्वय कलम 306,34 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वय कलम 3(2)(पाच) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन एक आरोपीला नवेगाव/बांध पोलीसांनी (Navegaon/Bandh Police) अटक केली आहे.
दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी
मुख्य आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासुन आठवडा उलटला असला तरी पण मुख्य आरोपी अजुनही फरारच आहे. तर मुख्य आरोपीला नवेगाव/बांध पोलीस केव्हा अटक करतात आणि याप्रकरणात आणखी काही मोठे मासे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर (Navegaon/Bandh) राष्ट्रीय उद्यानात झालेली मृतक सुदाम किरसान यांची हत्या आहे की आत्महत्या आहे. 17 ,तारखेला सायंकाळी जवळपास ६:00 नंतर कार्यालयात अरवींद नागपूरे व त्याचे 3 साथीदार भोजू माळगाम, विशाल चांदेवार ,मृतक सुदाम किरसान यांच्यात घडलेल्या भिषन भांडनाचे काय झाले? याबाबद या (Murder Case) प्रकरणाची क्षेत्रातील लोकप्रतिनिधि आणि शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन चौकशी करावी दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.