गुन्हयाचा 5 तासात उलगडा, 5 जनावर गुन्हा दाखल पत्नी व प्रियकराला अटक!
उदगीर (Murder Case) : वैवाहिक प्रेमी युगलाच्या अनैतीक संबंधात (Immoral Relationship) अडथळा ठरणार्या पतीचा खून पत्नी व तिच्या प्रियकराकडून केल्याची घटना दि.२७ऑगस्ट रोजी उदगीर येथे घडली आसून उदगीर ग्रामिण पोलिस स्टेशनमध्ये 5 जनाविरुध्द दि.२८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आसून मयताची पत्नी व तिचा प्रियकराला अटक करण्यात आली आहे. पोलिसाकडून मिळालेली माहिती आशी की, हणमंत शरनअप्पा जनवाडे वय 40 वर्षे रा पारकटटी गल्ली यास त्याची पत्नी पुजा हाणमंत जनवाडे व तिचा प्रियकर सुनिल उर्फ पिंटु पाटील याने त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत आसल्याने त्याच्या तीन मित्राच्या मदतीने संगणमत करुन ईच्छापुर्ती हनुमान मंदीराचे जवळ जबरदस्तीने ॲटोमध्ये घेवुन जावुन मयत हाणमंत जनवाडे याच्या डोक्यात, पाटीवर, हातावर, पायावर, पिंडरीवर जबर दुखापत करुन त्याचा खुन केला आहे. आशी आशयाची तक्रार विनोद धनराज जनावडे(२४, रा. एसटी कॉलनी. मुळेनगर, उदगीर, ता. उदगीर, ह. मु. निटुरबी, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक ) यांनी दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम १०२(१), १२७(२), २(५) भारतीय “न्याय संहिताप्रमाणे पूजा हनुमंत जनवाडे (वय ३५, रा. पारकट्टी गल्लीं, उदगीर ), सुनील ऊर्फ पिंटू पाटील (रा. जानापूर, ता. उदगीर ) ‘सोबत दुसरे ‘ तीन अनोळखी ‘पुरुष आरोपी यांच्यविरोधात खुनाचा गुन्हा उदगीर ग्रामिण पोलिसात (Udgir Rural Police) नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक देवकर हे करीत आहेत.
पत्नीचा बनाव, मुलांच्या सांगण्यावरुन खुनाचे फुटले बिंग!
पत्नीने व प्रियकरांने कट रचन त्याला घरातून ॲटोने घेऊन गेले व प्रियकराने मोकळ्या जागेत घेऊन जाऊन मित्रांच्या मदतीने काठीने बेदम मारहाण केली. व त्यानंतर ठरल्याप्रमाणे पत्नीने घटनास्थळी येऊन पतीला रुग्णालयात दाखल केले ग्रामीण पोलिसांनी रात्रभर तपास गतीमान केला. व मयताच्या सहावीत शिकर्या मुलाने व चौथीत शिकणाऱ्या मुलीच्या माहितीवरुन खुनाचे बिंग फुटले.
– पोलिस निरिक्षक राजकुमार पुजारी पोलीस स्टेशन, उदगीर ग्रामिण




