गोरेगाव (murder case) : तालुक्यातील म्हसगाव येथे १ व २ मेच्या रात्री दरम्यान घरात शिरून ढिवरू इळपाचे (५५) याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, ढिवरूच्या शेजारी झोपलेल्या ७५ वर्षीय आईला या घटनेची भणक लागली नाही. या (murder case) घटनेचा तपास हाती घेत अवघ्या दोन दिवसात (Goregaon Police) पोलिसांनी प्रकरणाचे गुढ उकलले. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून तो आरोपी मृतक ढिवरूच्या नातेसंबधातून पुतण्याच असल्याचे समोर आले. विरेंद्र बेनीराम इळपाचे (२९) रा.म्हसगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
म्हसगाव येथील हत्या प्रकरण
म्हसगाव येथे १ मेच्या रात्री आर्शिवाद समारोह आयोजित होता. कार्यक्रमस्थळापासून काही अंतरावर राहत असलेल्या ढिवरू इसन इळपाचे (५५) या इसमाची घरात शिरून धारदार शस्त्राने हत्या (murder case) करण्यात आली होती. ही घटना २ मे च्या पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे म्हसगाव सह परिसरात एकच खळबळ उडाली. ढिवरूचे कुणाशीही वैर नसताना त्याची हत्या कुणी केली असावी? असा प्रश्न गावकर्यांसह पोलिसांपुढे निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द हत्येचा गुन्हा नोंद करीत तपासकार्य सुरू केले. स्थानिक गुन्हे शाखा व (Goregaon Police) गोरेगाव पोलिसांनी समांतर तपासातून अनेकांनी झाडाझडती घेत संशयाच्या आधारावर विरेंद्र बेनीराम इळपाचे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता विरेंद्र याने आपणच हत्या केल्याची कबूली दिली. जुन्या वादावरून ढिवरूची हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी विरेंद्र इळपाचे (२९) याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोनि अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलिस करीत आहेत.
१०० हून अधिक जणांची झाडाझडती
झोपेत असलेल्या ढिवरू इसन इळपाचे यांची २ मेच्या पहाटे धारदार शस्त्राने हत्या (murder case) करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अज्ञात असला तरी शोध घेणे पोलिसांपुढे एक आवाहन उभे झाले होते. अवघ्या हाकेच्या अंतरावर आर्शिवाद समारोह आयोजित असल्याने वर्हाड्यांची असतानाही घटनेला पूर्णरूप देण्यात आले होते. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व (Goregaon Police) गोरेगाव पोलिसांनी अधिकारी व कर्मचार्यांचे तपासी पथक कामाला लावले होते. दरम्यान १०० हून अधिक गावातील नागरिक तसेच आशिर्वाद समारोहात सहभागी झालेल्या वर्हाड्यांची झाडाझडती घेण्यात आली.