परभणी (Parbhani):- येथील नवा मोंढा पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या रामनगर येथे एका महिलेचा तीक्ष्ण हत्याराने वार करून दुपारी खून केल्याची घटना ७ जुलै रोजी घडली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
घटना स्थळावर अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी दिली भेट
शहरातील रामनगर येथे राहणार्या लक्ष्मी ज्ञानेश्वर सोळंके वय ४५ वर्ष दुपारी घरात एकटी होती. या दरम्यान कोणीतरी एक व्यक्ती घरी आला होता. त्या व्यक्तीने लक्ष्मी यांच्या डोक्यात व मानेवर तीक्ष्णहत्याराने वार करून त्यांचा खून (Murder)केला. त्यानंतर तो व्यक्ती प्रसार झाला. ही घटना अंदाजे दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लक्ष्मी यांचा मुलगा घरी आल्यानंतर त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले, प्रचंड आरडाओरडा केल्यानंतर शेजार्यांनी धावत येऊन लक्ष्मी यांना रुग्णालयात(Hospital) उपचारासाठी नेले. जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर लक्ष्मी याना मृत असल्याचे घोषित केले त्यानंतर घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली पंचनामा करून संबंधित खून करणार्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयात उशिरापर्यंत शविच्छेदन (Autopsy) चालू होते. उशिरापर्यंत खून कशामुळे झाला याबद्दल मात्र कुठलीच माहिती मिळाली नाही. आरोपीच्या तपास करण्यासाठी घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी भेट दिली.
गोदावरी नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
गंगाखेड तालुक्यातील खळी पाटीजवळील पुलाखाली गोदावरी नदी पात्रात रविवार ७ जुलै रोजी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (dead body) आढळून आला आहे. यात घातपाताचा संशय आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी व अन्य पोलीस अधिकार्यांच्या उपस्थितीत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.